महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार !

राज्यात पेट्रालचे दर प्रतिलिटर ५ रुपयांनी, तर डिझेलचे दर प्रतिलिटर ३ रुपयांनी न्यून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रात्री १२ पासून हा निर्णय लागू झाला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ६ सहस्र कोटी रुपयांचा भार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल !

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची वाटचाल इशारा पातळीकडे (३९ फूट) चालू आहे. १४ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता ही पातळी ३७ फूट २ इंचावर पोचली.

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला द्यावयाच्या आरक्षणाविषयी सर्वाेच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीमुळे राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.

नाशिक येथील मुक्त विद्यापिठाच्या प्रश्नपत्रिकेत मनुस्मृती आणि रामदासस्वामी यांच्याविषयीच्या प्रश्नाला भाकपचा विरोध !

यशवंत चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या ‘राज्यशास्त्र’ या विषयाच्या १२ जुलै या दिवशी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत मनुस्मृतीच्या संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी आहे, असे सांगून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) याचा निषेध नोंदवला आहे. 

मंदिर बंद ठेवून करण्यात येणार्‍या कृती कॅमेर्‍यासमोर होणे आवश्यक ! – ललिता शिंदे, माजी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान

गडावर असलेले भगवती सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर येत्या २१ जुलैपासून अनुमाने दीड मास बंद ठेवण्याच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयाला भाविकांनी हरकत घेण्यास प्रारंभ केला आहे. वणी देवस्थान विश्वस्त मंडळाने मनमानी पद्धतीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिहाद संपवण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत केले होते, हे लक्षात ठेवा ! – सुरेश चव्हाणके, प्रमुख संपादक, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी

‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक सुरेश चव्हाणके यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला अमरावती येथे उत्स्फूर्त प्रतिसाद !

गुरूंना आवडणार्‍या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निश्चय करा ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

गुरुपौर्णिमेचा उद्देश केवळ गुरुचरणी नतमस्तक होणे, हा नसून या दिवशी गुरुसेवेची ही अमूल्य पर्वणी मिळते. आत्मज्ञान हे केवळ गुरूंमुळे प्राप्त होते, त्यासाठी नियमित गुरुसेवा करणे आवश्यक आहे. गुरूंना जे आवडते, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा.

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलैला !

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २० जुलै या दिवशी होणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अतीवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

वर्धा येथे ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटनांचे प्रमाण कायम !

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने घोषित केलेल्या अनुमानावरून राज्यातील काही ठिकाणी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटना घडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.