अतीवृष्टीमुळे निर्णयात पालट !
मुंबई – राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २० जुलै या दिवशी होणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अतीवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता ३१ जुलै या दिवशी घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असून २० जुलैचे परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रच ३१ जुलैच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.