बीड येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे निधन !

आध्यात्मिक क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्त्व असलेले थोरले पाटांगण येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे १६ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

ज्योतिषशास्त्राचे महत्त्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’

अफगाणिस्तानातून नवी मुंबईत आणलेले ३६३ कोटी रुपयांचे हेरॉइन पोलिसांच्या कह्यात !

अफगाणिस्तान येथून दुबईमार्गे हा अमली पदार्थ आणण्यात आल्याची शक्यता आहे. याचे वजन ७२ किलो ५१८ ग्रॅम इतके आहे. तस्करांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

सनातन संस्थेच्या वतीने नवी देहली, नोएडा, मथुरा (उत्तरप्रदेश) आणि फरिदाबाद (हरियाणा) येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

मथुरामधील श्रीजी गार्डन सोसायटीमध्ये आणि फरिदाबादच्या सेक्टर २८ मधील रघुनाथ मंदिर येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाचा मोठ्या संख्येने जिज्ञासूंनी लाभ घेतला.

उत्तर आणि पूर्वोत्तर भारत क्षेत्रात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन’ बैठकांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

या बैठकीमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, बंगाल, आसाम आदी राज्यांतील जिज्ञासू जोडलेले होते. या बैठकांमध्ये ‘जीवनातील गुरूंचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीकोनातून साधनेचे महत्त्व’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीतालाही महत्त्व द्या ! – पं. मुकुंद मराठे

नाट्यगीत हा शास्त्रीय गायनाचा भाग आहे. नाट्यसंगीत हे भावसंगीत असले, तरी त्यात शास्त्रीय संगीतातील उत्स्फूर्तता आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीतालाही महत्त्व द्या. रसिकांनीही प्रत्येक मैफलीत गायकांना नाट्यगीत गाण्याचा आग्रह धरावा’, अशी अपेक्षा ज्येष्ठ गायक पं. मुकुंद मराठे यांनी व्यक्त केली.

मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरातील जलाभिषेक २ वर्षांनी पूर्ववत् !

मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ या शिवमंदिरातील जलाभिषेक विधी २ वर्षांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने पूर्ववत् चालू झाला आहे. आमदार लोढा यांनी मंदिराचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून मंदिरातील जलाभिषेक विधी पुन्हा चालू केला आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेला भाविक आणि जिज्ञासू यांची उपस्थिती !

मुंबईसह नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांत असलेले विविध गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी जिज्ञासू आणि भाविक यांनी उपस्थित राहून गुरुपूजन अन् अध्यात्माविषयीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.