बीड येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे निधन !

वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर

बीड – येथील आध्यात्मिक क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्त्व असलेले थोरले पाटांगण येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे १६ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. धुंडीराज शास्त्री हे बीड जिल्ह्याचे आध्यात्मिक वैभव होते. त्यांचा वेद, तसेच आयुर्वेद यांविषयी गाढा अभ्यास होता. बीड शहरात थोरले पाटांगण हे मोठे आध्यात्मिक पीठ मानले जाते, या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक सेवा केली. त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

सनातनच्या कार्याला ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचा आशीर्वाद !

वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला नेहमी आशीर्वाद आणि सहकार्य असे. बीड येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळीही ते वस्तू रूपाने अर्पण देत असत.