गोफण (रायगड) येथे गोहत्या करणारी टोळी अटकेत !

गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही गोवंशियांची हत्या चालूच रहाणे, हे कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच लक्षण !

सातारा जिल्ह्यात वजन-काट्यांमध्ये फसवणूक करणार्‍या ९३ व्यापार्‍यांवर कारवाई !

जिल्ह्यातील सर्व प्रकारचे व्यापारी, व्यावसायिक, पेट्रोल पंपधारक यांच्या वजनमापांची वैधता जिल्हा वजनमापे वैधता नियंत्रण साहाय्यक कार्यालयाकडून पडताळली जाते. गत २ वर्षांच्या कालावधीत ९३ व्यापारी वजन-काट्यांमध्ये फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार वजनमापे वैधमापन कार्यालयाने संबंधितांवर कारवाई केली आहे.

राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या नियुक्त !

राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्रे सिद्ध करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ११ सहस्र ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीत तातडीने साहाय्य करता यावे, यासाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला नियुक्त करण्यात आले आहे.

गणेशोत्सवानिमित्त रोहा-चिपळूण १२ डब्यांची ‘मेमू’ !

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा-चिपळूण ‘मेमू’ गाडी चालवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या गाडीचे रोहा ते चिपळूण केवळ ९० रुपये तिकीट आहे.

आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकाच्या संदर्भात चुकीचे काम होऊ नये !

आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाच्या संदर्भात चुकीचे काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. ‘ग्लोबल टीचर ॲवार्ड’ विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली.

विशाळगड येथील ढासळलेल्या बुरुजाचे दगड उचलण्यास साहाय्य करावे !

पुरातत्व विभागाचे सह्याद्री प्रतिष्ठान संघटनेला आवाहन

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, असे का वाटणार नाही ? – खासदार संजय राऊत, शिवसेना

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येतील का ? हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी आहेत. इतकी वर्षे आम्ही काम केले आहे. ते एकत्र यावेत, असे का वाटणार नाही ?, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

चित्रपटातील गुरुपूजनाचे दृश्य पाहून राजकीय मंडळींनी केली नेत्यांची पाद्यपूजा !

‘आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करून मोक्षाचा मार्ग दाखवणारे’, असे गुरूंचे महत्त्व हिंदु धर्मात आहे. त्यामुळे शिक्षण, राजकारण यांसह विविध क्षेत्रांतील स्वत:च्या मार्गदर्शकांना गुरुस्थानी मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये आहे.

गंगाखेड (जिल्हा परभणी) येथील नागोबाची मूर्ती चोरीला गेल्यापासून गावामध्ये नागाचा वावर !

गुरुपौर्णिमेच्या (१३ जुलैच्या) रात्री येथील मंदिरातील पुरातन नागोबाची मूर्ती अज्ञातांनी चोरली. ही मूर्ती चोरीला गेल्यापासून मंदिरामध्ये, तसेच गावामध्ये प्रतिदिन मोठा नाग दिसत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.