पन्हाळा येथे निष्क्रीय पुरातत्व विभागाच्या विरोधात सहस्रो शिवभक्तांच्या एकतेचा हुंकार !

‘गड-दुर्गप्रेमी, शिवप्रेमी म्हणून आंदालेनासाठी उपस्थित रहा’, असे आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आले होते. याची नोंद घेत सहस्रो शिवभक्त पन्हाळा येथे उपस्थित होते.

रूचेश जयवंशी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी !

गत अडीच वर्षांपासून जिल्हा प्रशासनाचे उत्तरदायित्व पार पाडणारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागी बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रूचेश जयवंशी हे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील.

सातारा येथे २ ट्रक भरून ‘व्हीलचेअर’ भंगारात

येथील मोळाचा ओढा परिसरात असणार्‍या एका भंगाराच्या दुकानात मध्यरात्री सुस्थितीतील २ ट्रक भरून ‘व्हीलचेअर’ (चालता न येणार्‍यांसाठी वापरायची चाकांची आसंदी) आल्याचे अपंग बांधवांना समजले. त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन …

नवी मुंबई येथे १४ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत महोत्सव रन’चे आयोजन !

नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत महोत्सव रन’(दौड) सीबीडी पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता दौड होणार आहे.

रस्त्यांच्या कामांचे दायित्व कुणाचे ?

राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस चालू झाल्यावरच रस्त्यांवर खड्डे दिसू लागले. यातून काही मासांपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा नेमका कसा होता ? हे आता सर्वांच्या समोर आले आहे.

कोल्हापूर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता लाच घेतांना अटक !

नवीन पाण्याच्या जोडणीसाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र बळवंत हुजरे यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

मुंबईत ‘बेस्ट’ची मोनोच्या खांबाला धडक !

बेस्ट बसच्या चालकाला अपस्माराचा (फीट) झटका आल्याने त्याचे नियंत्रण सुटून बस मोनोच्या खांबाला धडकली. ही घटना सकाळी चेंबूर वसाहत परिसरात घडली. बसमध्ये १२ ते १५ प्रवासी होते; पण यात कुणीही घायाळ झाले नाही

ग्रामीण भागातील मुलींना बसचा पास विनामूल्य मिळण्यासाठी कन्या शाळेचा एस्.टी. प्रशासनाकडे पत्रव्यवहार !

ग्रामीण भागातील मुलींसाठी ज्ञानाची कवाडे उघडी रहावीत, यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा शहरातील कन्या शाळेच्या वतीने या भागातील मुलींसाठी बसचा पास विनामूल्य मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत.

कोलगाव येथील शासकीय गोदामाची इमारत ३ वर्षे धूळ खात पडून

गेली अडीच वर्षे सत्तेत असूनही गोदामाच्या कार्यवाहीसाठी काही न करणारी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे १५ ऑगस्टपूर्वी कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार !