कोल्हापूर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता लाच घेतांना अटक !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोल्हापूर, २२ जुलै (वार्ता.) – नवीन पाण्याच्या जोडणीसाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र बळवंत हुजरे यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. रंकाळा बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे महापालिकेकडील मान्यताप्राप्त ‘जोडारी’ (प्लंबर) आहेत.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचारग्रस्त भारत !