नवी मुंबई येथे १४ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत महोत्सव रन’चे आयोजन !

नवी मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत महोत्सव रन’(दौड) सीबीडी पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता दौड होणार आहे.

‘स्वराज्य महोत्सवा’निमित्त आयोजित ‘अमृत महोत्सव रन’(दौड) मध्ये अधिकाधिक धावपटू आणि नागरिक यांनी सहभागी होऊन देशाविषयीचे आपले प्रेम अन् आदर व्यक्त करावा’, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी केले आहे.

१. ही दौड ५ आणि १० कि.मी. अंतराची असून महानगरपालिका मुख्यालय येथून चालू होऊन पुन्हा तेथेच तिचा समारोप होईल.

२. दौडीत सहभागी होण्यासाठी १ सहस्राहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी नावनोंदणी केली आहे.

३. नागरिकांनीही https://youtoocanrun.com/races/navi-mumbai-10k/ या वेबलिंकचा वापर करून नोंदणी करून दौडीत सहभागी व्हावे. नोंदणी सशुल्क असून सर्व धावपटूंना बीब, टाईमर चिप्स, मेडल्स आणि टी-शर्ट्स देण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या ३ क्रमांकांस स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.