कुठे पाश्चात्त्य विचारसरणी, तर कुठे हिंदु धर्म !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी त्यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेल्या षड्यंत्राची माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि इतरांमध्ये जागृती करण्याचा निश्चय केला.
म्हापसा (गोवा) येथे ‘हिंदु-राष्ट्र’ संघटन बैठकीत ‘हलाल प्रमाणपत्र’ अनिवार्य केल्याने उद्भवणार्या समस्यांविषयी हिंदूंचे प्रबोधन !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास येथील कला, संस्कृती यांना अधिक उजाळा मिळेल, असे मत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका किरण सोनी गुप्ता यांनी व्यक्त केले.
अखिल भारत हिंदु महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी यांनी दिली.
हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडून देहू नगरीच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे २३ जुलै या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले.
‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह मिळण्यासाठी बहुमत सिद्ध करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना नोटीस दिली आहे. यासाठी आयोगाने ८ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत मुदत दिली आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे पदव्युतरच्या दुसर्या आणि तिसर्या वर्षाच्या विद्यार्थ्यांवर कामाचा ताण येत आहे. हे लक्षात घेता वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, असे प्रसिद्धीपत्रक मार्डकडून काढण्यात आले आहे.
१८ जुलैच्या रात्री ११ वाजता शोहेब अंसारी आणि अन्वर अंसारी या दोघांनी गावाकडील ओळखीचा १९ वर्षीय तरुण कामावरून घरी जात असतांना त्याला रस्त्यात अडवून मारहाण करत एका सदनिकेत नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.