श्रीक्षेत्र चाफळ (सातारा) येथील श्रीराम मंदिराच्या दारातच उघडले मांसाहारी खाद्यपदार्थाचे दुकान !

श्रीक्षेत्र चाफळ येथे समर्थ स्थापित श्रीराम मंदिराच्या दारात अगदी १०० मीटर अंतरावर गावातीलच एका व्यावसायिकाने मांसाहारी खाद्यपदार्थाचे (चायनीज सेंटर) दुकान उघडले आहे. यामुळे गावातील रामभक्त युवक आणि ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त केला आहे.

ससून रुग्णालयातून दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या चौकशीचे आदेश !

समाजातील नीतीमत्ता ढासळत चालल्याचे हे अजून एक उदाहरण ! अनेक वर्षांपासून बनावट प्रमाणपत्रे दिली जात असूनही ससून रुग्णालयावर कारवाई का केली नाही ? बनावट प्रमाणपत्रांमुळे अयोग्य व्यक्तींनी लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी !

जेजुरीतील ‘श्री खंडोबा देवा’च्या सोमवती यात्रेला दोन वर्षांनी भाविकांची प्रचंड गर्दी !

३० मे या दिवशी सकाळी ११ वाजता खंडोबा गडामध्ये पालखी प्रस्थान सोहळा झाला. या वेळी भाविकांनी भंडाऱ्याची प्रचंड उधळण केली. या वेळी खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थ यांना ‘रोजमारा’चा (ज्वारी धान्य) प्रसाद वाटला.

सातारा पोलीस मुख्यालयासमोर निवृत्त पोलिसांचेच आंदोलन !

सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन असो किंवा कार्यालयीन कामांविषयी दिली जाणारी हीन प्रतीची वागणूक असो, अशा विविध विषयांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्ता बंद आंदोलन !

नुपूर शर्मा यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे निदर्शने करून दारूल फलाह मशिदीसमोर रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

जुने गोवे येथे ‘इन्क्विझिशन हाऊस’ कुठे गाडले आहे, याचा हिंदूंनी छडा लावावा ! – जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ

‘हिंदु रक्षा महाआघाडी’च्या वतीने म्हापसा येथे ‘गोवा फाइल्स’ प्रदर्शन

धर्म : गोळी कि चैतन्याचे बीज ?

‘धर्म अफूची गोळी आहे कि चैतन्याचे बीज ?’, हे येत्या काळात संपूर्ण विश्वाला लक्षात येईल !

दूषित पाण्याविषयी प्रतिदिन ३०-४० महिलांच्या तक्रारी !

‘अमृत योजने’मुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी गटारी फुटून त्यांचे पाणी घरापर्यंत येत आहे. दूषित पाण्यामुळे अनेकांना पोटदुखीचा त्रास होत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला.

मुंबईतील २६९ अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे पालिकेकडून आवाहन !

मुंबईमध्ये २६९ शाळा अनधिकृत असून पालकांनी तेथे मुलांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळांची सूची महापालिकेने संकेतस्थळावर ठेवली आहे. अनधिकृत शाळांवर बंदी घालण्यासह त्यांच्याकडून आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे.

निधन वार्ता

नवीन पनवेल, येथील साधक श्री. प्रशांत दत्ताराम काठे यांची आई श्रीमती छाया दत्ताराम काठे (वय ८५ वर्षे) यांचे २७ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.