पुणे – ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेला अंदाजे ४ लाख भाविकांनी खंडोबाच्या पालखी सोहळ्यावर भंडाऱ्याची उधळण करत जयजयकार केला. कोरोनाच्या संसर्गामुळे २ वर्षे सोमवती यात्रा भरली नव्हती. त्यामुळे ३० मे या दिवशी सोमवती अमावास्या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठ्या संख्येने भाविक जेजुरीमध्ये आले होते. ३० मे या दिवशी सकाळी ११ वाजता खंडोबा गडामध्ये पालखी प्रस्थान सोहळा झाला. या वेळी भाविकांनी भंडाऱ्याची प्रचंड उधळण केली. या वेळी खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थ यांना ‘रोजमारा’चा (ज्वारी धान्य) प्रसाद वाटला.