मुंबई वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घातलेल्या सहप्रवाशांवर कारवाई !

मुंबईत यासाठी २ पाळ्यांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रतिदिन पोलिसांकडून ५०० जणांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील प्रवाशाकडे हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड पोलिसांकडून वसूल केला जात आहे.

सातारा जिल्ह्यात २८ जून ते ४ जुलैपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा !

२८ जून या दिवशी दुपारी नीरा येथील नदीघाटावर पालखीचे आगमण होऊन तेथेच विसावेल. दुपारी नैवेद्य अन् महाआरती झाल्यावर पालखी लोणंद येथे मुक्कामी जाईल.

गेल्या ३ वर्षांतील महिला अपहरण आणि बेपत्ता या प्रकरणांचा पुनर्अभ्यास करा ! – डॉ. नीलम गोर्‍हे

मुली आणि महिला वावर करत असलेल्या ठिकाणचे परिसर सुरक्षित असावेत. सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍या महिलांसाठी एकत्रित ‘व्हॉट्सॲप’ गट सिद्ध करून त्याद्वारे त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत.

नागपूर येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात साडेचार वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

खेळणार्‍या विराजवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केले आणि त्याला ५० फुटांपर्यंत फटफटत नेले. त्याच्या शरिराचे लचके तोडले. नागरिकांनी धाव घेऊन कुत्र्यांना हाकलले.

संजय राऊत यांनी आचारसंहितेचा भंग केला ! – भाजप

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ६ आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले नसल्याचा दावा करत त्यांची नावे उघड केली आहेत. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

तलावाचे पाणी शेवटपर्यंतच्या शेतकर्‍याला मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

तलावातील साठवण क्षमता वाढवण्यासमवेतच तलावावरील असलेल्या लहान बंधार्‍याचे पाणी शेवटपर्यंतच्या शेतकर्‍याला कसे मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

उल्हासनगर महानगरपालिकेतील लाचखोर कर निरीक्षकासह २ लिपिकांना अटक !

उल्हासनगर महानगरपालिकेतील कर विभागात कार्यरत असलेल्या एका प्रभारी कर निरीक्षकासह २ लिपिकांना ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे रायगडाकडे प्रस्थान !

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवनेरीहून रायगडाच्या दिशेने प्रस्थान केले आहे. पादुकांवर पवमान अभिषेक आणि रुद्राभिषेक झाला. त्यानंतरच श्री शिवाईदेवीची महापूजा बांधून आणि महाद्वार पूजन करून हा पालखी सोहळा रायगडाकडे मार्गस्थ झाला.

पुणे जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण अत्यल्प !

जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी २१० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मुलींच्या जन्माचे प्रमाण दर हजारी मुलांच्या प्रमाणात साडेचारशेच्या आत आले आहे. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायती मुलींच्या जन्माच्या प्रमाणाविषयी ‘रेडझोन’मध्ये गेल्या आहेत.

शुक्रवारचा हिंसाचार !

आज केवळ दगडफेक करणारे दंगलखोर धर्मांध उद्या सशस्त्र म्हणजे तलवारी, बंदुका घेऊन सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले, तर हिंदूचे रक्षण कोण करणार ? याचा विचार आतापासून केला पाहिजे.