विद्यापिठांनी देशाला पुढे घेऊन जाणारी सामर्थ्यवान युवा पिढी घडवावी ! – रतन टाटा, उद्योगपती

राजभवनात आयोजित केलेल्या ‘एच्.एस्.एन्.सी. समूह विद्यापिठा’च्या पहिल्या विशेष दीक्षांत समारंभात रतन टाटा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘मानद डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आणि हिंदुसाम्राज्यदिन यांच्या निमित्ताने अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ !

कोरोनाच्या संकटानंतर २ वर्षांनी सर्व हिंदुत्वनिष्ठ प्रथमच अधिवेशनाच्या माध्यमातून एकत्रित भेटले. त्या वेळी सर्वांच्या तोंडवळ्यावर उत्साह आणि आनंद जाणवत होता, तसेच सर्वांमध्ये एकत्र कुटुंबभावना दिसून आली.

‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे संतांच्या हस्ते लोकार्पण !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या सत्रानंतर ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’, या हिंदु जनजागृती समितीच्या मराठी आणि हिंदी या भाषांतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.

पुण्यात पंजाब पोलिसांकडून सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची चौकशी !

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी सौरव महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची देहली आणि मुंबई येथील पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता पंजाब पोलिसांकडूनही त्याची चौकशी चालू झाली आहे.

नाशिक येथे तत्कालीन प्रशासनाधिकारी उपासनी यांच्या चौकशीला वेग

कामचुकारपणा करणार्‍या अशा अधिकार्‍यांना बडतर्फ करून घरी पाठवणे हीच शिक्षा त्यांना योग्य आहे. अशा अधिकार्‍यांमुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी होते, हे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात कसे येत नाही ?

नगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गैरव्यवहार प्रकरणी ५ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये कोंभळी (ता. कर्जत) येथे संगनमताने खाटे दस्तऐवज सिद्ध करून ९ सहस्र ३२० रुपयांचा, तर चांदे खुर्द येथे ५८ सहस्र २४८ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे नोंद केले आहेत.

जोतिबा डोंगरावर १ जुलैपासून माणसी ५ रुपये यात्रा कर !

जोतिबा डोंगरावर येणार्‍या भाविकांकडून प्रतिमाणसी आता १ जुलैपासून २ रुपयांऐवजी ५ रुपये यात्रा कर आकारण्यात येणार आहे. जोतिबा ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पाणीपुरवठा करतांना महापालिकेची कसरत !

या गावांना पाणीपुरवठा करण्याकरता वर्ष २०२०-२०२१ च्या मेच्या तुलनेत १२ सहस्रांहून अधिक टँकर पुरवावे लागले आहेत.

देहू येथे मुख्य कमानीवर दुर्मिळ शिलालेख आढळला !

शिलालेखावर श्री क्षेत्र देहू येथे श्री रुक्मिणी पांडुरंग देव आणि तुकाराम महाराज यांचे देवालय आहे, तसेच त्या सभोवताली असलेल्या प्राचीन ओवर्‍या आणि त्याचा जीर्णोद्धार होण्याविषयीचा उल्लेख आहे.

रायगडाशी संबंधित २ सहस्र मोडी कागदपत्रे प्रकाशात !

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे चिटणीस पांडुरंग बलकवडे यांच्या संशोधनामुळे रायगडाच्या इतिहासातील काही अपरिचित गोष्टी समोर आल्या आहेत. संशोधक मंडळाच्या कार्यालयात रायगडाशी संबंधित २ रुमालांमध्ये अनुमाने २ सहस्र मोडी कागदपत्रे सापडली आहेत.