सातारा जिल्ह्यात २८ जून ते ४ जुलैपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा !

सातारा, १२ जून (वार्ता.) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २८ जून ते ४ जुलै या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

२८ जून या दिवशी दुपारी नीरा येथील नदीघाटावर पालखीचे आगमण होऊन तेथेच विसावेल. दुपारी नैवेद्य अन् महाआरती झाल्यावर पालखी लोणंद येथे मुक्कामी जाईल. येथे २९ जून या दिवशी संपूर्ण दिवस दर्शन आणि मुक्काम. ३० जून या दिवशी पालखी पुढे प्रस्थान करेल. चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण सोहळा पार पडेल. दुपारचा विसावा घेऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी जाईल. १ आणि २ जुलै या दिवशी पालखी फलटण विमानतळावर मुक्काम करेल, तर ३ जुलै या दिवशी पालखी बरड येथे मुक्काम असेल. ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे मुक्कामासाठी प्रस्थान करेल.