ठाणे, १२ जून (वार्ता.) – उल्हासनगर महानगरपालिकेतील कर विभागात कार्यरत असलेल्या एका प्रभारी कर निरीक्षकासह २ लिपिकांना ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. मालमत्ता कराच्या पावतीवर नावाची नोंद करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. उल्हासनगर येथील कँप ४ भागात रचलेल्या सापळ्यात लिपिक शंकर सोहंदा, प्रभारी कर निरीक्षक भानू परमार आणि कर लिपिक बलराम गिदवानी या तिघांनी लाच मगितल्याचे निष्पन्न झाले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)