नागपूर – भटक्या कुत्र्यांनी केलेल्या आक्रमणात साडेचार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. (स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील दु:स्थिती ! – संपादक) खेळणार्या विराजवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केले आणि त्याला ५० फुटांपर्यंत फटफटत नेले. त्याच्या शरिराचे लचके तोडले. नागरिकांनी धाव घेऊन कुत्र्यांना हाकलले. तोपर्यंत विराजचा मृत्यू झाला. मोकाट कुत्र्यांच्या त्रासाविषयी परिसरातील नागरिकांनी अनेकदा नगरपरिषद आणि संबंधित विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या; परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. (असे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ? – संपादक)