पालघर – मुली आणि महिला वावर करत असलेल्या ठिकाणचे परिसर सुरक्षित असावेत. सार्वजनिक ठिकाणी वावरणार्या महिलांसाठी एकत्रित ‘व्हॉट्सॲप’ गट सिद्ध करून त्याद्वारे त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकार्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत. पालघर जिल्ह्यात महिला-मुली हरवल्याची आणि त्यांचे अपहरण झाल्याची संख्या लक्षात घेता गेल्या तीन वर्षांतील प्रकरणांवर पुन्हा अभ्यास करून त्यांचा अहवाल ९ ऑगस्टपर्यंत सादर करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी प्रशासनाला दिले. पालघर येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
संपादकीय भूमिकाप्रशासनाला पुन्हा अभ्यास करा, हे सांगण्याची वेळ का येते ? पहिल्या अभ्यासातील त्रुटींचा अभ्यास होतो का ? |