मुंबई – मुंबई वाहतूक पोलिसांनी सहप्रवाशांसाठी हेल्मेटसक्तीची दिलेली १५ दिवसांची मुदत संपल्यावर ९ जूनपासून धडक कारवाई चालू केली. पहिल्याच दिवशी हेल्मेट परिधान न केलेल्या ३ सहस्र ४२१ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली. चालक आणि सहप्रवासी मिळून एकाच दिवशी ६ सहस्र २७१ जणांवर ई-चलान जारी करण्यात आले.
मुंबईत यासाठी २ पाळ्यांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रतिदिन पोलिसांकडून ५०० जणांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील प्रवाशाकडे हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड पोलिसांकडून वसूल केला जात आहे.