बहुमत चाचणीत विजय आमचाच ! – एकनाथ शिंदे

गौहत्ती (आसाम) – आमच्याकडे ५० आमदार आहेत. कोणत्याही आमदारावर बळजोरी नसून बहुमत चाचणीत आमचाच विजय होईल, असा विश्वास आमदार एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. गौहत्ती येथे श्री कामाख्यादेवीच्या दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या गट आज मुंबईत येणार !

शिवसेनेपासून वेगळा झालेला आमदार एकनाथ शिंदे यांचा गट सर्व आमदारांसह गोवामार्गे ३० जून या दिवशी मुंबईत येणार आहे. गोवा येथील ‘ताज कन्व्हेन्शन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांसाठी ७१ खोल्या राखीव ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेचे ३० जूनला सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे.