माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी !

किशोरी पेडणेकर

मुंबई – मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र रायगडहून आले असून यापूर्वीही दोन वेळा त्यांना जिवे मारण्याची धमकी आली होती. पेडणेकर या प्रकरणी पोलिसांत तक्रार करणार आहेत.

पत्रात पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच बलात्कार करण्याचीही धमकी दिली आहे. या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचे लिहिले आहे.