पिंपरी (जिल्हा पुणे) – जून महिना संपत आला, तरी राज्यासह पुण्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पुणे महापालिकेत अनेक गावांचा समावेशही झाला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात बर्याच ठिकाणी अल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावर महापालिकेकडून तोडगा काढण्यात येत नसल्याने नागरिक संतापले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी महापालिकेसमोर हंडा मोर्चा काढला. (मूलभूत सुविधांसाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत: हून कृती का करत नाही ? – संपादक)