राजस्थानमधील काँग्रेस सरकार कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई करणार का ?

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी बूंदी (राजस्थान) येथील मौलाना मुफ्ती नदीम अख्तर याने सूड उगवण्याची धमकी दिली आहे.

जर राजे येथे घडले नसते !

मशिदी आणि चर्च यांच्या बांधकामाच्या पुरात ।
हिंदूंच्या मानसिक भ्याडपणाचे थडगे उभे असते ।।
एक शिवाजी पुरून उरला सर्व नराधमांना ।
नसता तुम्ही, तर राजे कुणीच पुढे सरसावले नसते ।।

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

काही लोकांच्या मनात प्रश्न येत असेल, ‘विदेशातही स्थानदेवता किंवा ग्रामदेवता असतात का ?’ तर हो. तेथेही या देवता असतात. यासंदर्भात आलेली एक अनुभूती . . .

मावळ्यांचे विडंबन थांबवा !

छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणजेच महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाचा बघण्याचा आपला अभिमान कृतीतून दिसला पाहिजे. याउलट विदेशात अगदी अलीकडच्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाही प्रेमाने जपला जातो. हिंदु राष्ट्रात असे अपप्रकार नसतील !

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात सर्वांनी संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता किरण बेट्टदापूर, सर्वाेच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय

भारतातील विविध राज्यांतील सर्वपक्षीय सरकारांनी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यानंतर तेथे सुव्यवस्थापन होण्याऐवजी अनेक अपप्रकार अथवा घोटाळे होत आहेत.

ओळख परेडचे महत्त्व आणि नियम !

कुठल्याही गुन्ह्यामध्ये खरा आरोपी शोधून त्याला योग्य शिक्षा होणे, हे पोलीस विभाग आणि न्यायव्यवस्था यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असते. गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी साक्षीदाराकडून ‘ओळख परेड’ घेतली जाते.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. ज्ञानराज परेश चौखंडे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. ज्ञानराज परेश चौखंडे हा या पिढीतील एक आहे !

गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक

जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात.

श्री. शंकर राजाराम नरुटे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या आश्रमभेटीच्या वेळची क्षणचित्रे

कुटुंबियांना आश्रमातील साधकांची सेवावृत्ती आणि त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद आवडला. सर्व जण २ दिवसांसाठी आले होते; परंतु ते ४ – ५ दिवस राहिले. घरी जातांना सर्वांच्या डोळ्यांत भावाश्रू आले.

नम्र, पुढाकार घेऊन सेवा करणार्‍या आणि सेवेची तळमळ असलेल्या पुणे येथील कु. सिद्धी पढीयार !

पुणे येथील कु. सिद्धी पढीयार या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या संकेतस्थळावर ‘अपलोडिंग’ची सेवा करतात. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.