श्री. शंकर राजाराम नरुटे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या आश्रमभेटीच्या वेळची क्षणचित्रे

बसलेले पू. राजाराम भाऊ नरुटे; उभे असलेले डावीकडून कु. हर्षद बाबर, सौ. शोभा थोरात, सौ. सुनिता बाबर, सौ. मंगल काजारे, कु. प्रतीक्षा काजारे, श्री. शंकर नरुटे आणि श्री. संजय मगदूम

१. आश्रम पाहून सर्व जण प्रभावित होणे

‘माझे कुटुंबीय सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत नाहीत; परंतु सर्वांचा माझ्या साधनेला पाठिंबा आहे. माझ्या कुटुंबियांचा रामनाथी आश्रमात येण्याचा योग जुळून येत नव्हता. या वेळी देवाच्या कृपेने सर्वांना आश्रमात यायला मिळाले. आश्रम पाहिल्यावर सर्व जण प्रभावित झाले.

२. कुटुंबियांना आश्रमातील साधकांची सेवावृत्ती आणि त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद आवडला. सर्व जण २ दिवसांसाठी आले होते; परंतु ते ४ – ५ दिवस राहिले. घरी जातांना सर्वांच्या डोळ्यांत भावाश्रू आले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कुटुंबियांविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘श्री. शंकर नरुटे यांचे कुटुंब आदर्श आणि सात्त्विक आहे.’’

– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.३.२०२२)