ताजमहालचे खरे स्वरूप शोधण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने सरकारनेच आदेश देऊन खरा इतिहास हिंदूंना सांगितला पाहिजे.

मुसलमान नियमानुसार भोंग्यांचा वापर करत असल्याने पुन्हा न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही ! – मौलाना खालिद रशीद फरंगी महली

जनतेला असे वाटत नसल्याने तिला पुनःपुन्हा न्यायालयात जावे लागत आहे, याचा विचार मौलाना (इस्लामी विद्वान) का करत नाहीत ?

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले !

बद्रीनाथ धाम १ सहस्र २०० किलो वजनाच्या फुलांनी सजवण्यात आले आहे.

ज्ञानवापी मशिदीवरील हिंदूंची धार्मिक प्रतीके नष्ट केली जात आहेत !

पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक !  

औरंगजेबाच्या अमानुषतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही !- केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या संदर्भात औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली.

ज्ञानवापी मशीद हिंदूंकडे सोपवा ! – सोहेलदेव पक्षाचे मुसलमानांना आवाहन

मुसलमानांसाठी वाराणसीमध्ये असंख्य मशिदी आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या बदल्यात मुसलमानांना उत्तरप्रदेश सरकारने अन्यत्र जागा दिली पाहिजे.

मशिदींवर अत्याधुनिक कॅमेरे लावल्यास हिंसा कोण करतात, हे स्पष्ट होईल !

धार्मिक हिंसा जे करतात त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाते आणि ते जर मुसलमान असतील, तर त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाणार, यात चूक ते काय ?

युक्रेनकडून रशियाची युद्धनौका उद्ध्वस्त !

युक्रेनने रशियाची युद्धनौका काळ्या समुद्रात उद्ध्वस्त केेली. स्नेक आयलँडजवळ या युद्धनौकेवर युक्रेनने क्षेपणास्त्रे डागून ती उद्ध्वस्त केली. रात्री केलेल्या आक्रमणात ही नौका समुद्रात बुडवण्यात आली, असा दावा युक्रेनच्या एका खासदाराने केला आहे.

धार्मिक स्थळांवरून उतरवलेले भोंगे पुन्हा लावल्यास कारवाई करा !  

उत्तरप्रदेश राज्यात आतापर्यंत १ लाखाहून अधिक भोंगे धार्मिक स्थळांवरून उतरवले गेले आहेत. काढून टाकलेले हे भोंगे पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याचे दायित्व अधिकार्‍यांवर सोपवण्यात आले आहे.

धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथील विधानभवनावर अज्ञातांनी लावले खलिस्तानी झेंडे

खलिस्तानवाद्यांचे पाय हरियाणा आणि हिमाचल प्रदेश राज्यांपर्यंत पसरू लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्यांच्यावर आताच कठोर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे !