मुसलमान नियमानुसार भोंग्यांचा वापर करत असल्याने पुन्हा न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही ! – मौलाना खालिद रशीद फरंगी महली

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर मुसलमानांनी रमझानच्या काळात भोंग्यांचा वापर नियमानुसार केला आहे. आताही लोक याचे पालन करत आहेत, तरीही पुनःपुन्हा याच्यासाठी न्यायालयात जाणे योग्य नाही, असे मत ‘इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आणि येथील ईदगाहचे मौलाना (इस्लामी विद्वान) खालिद रशीद फरंगी महली यांनी व्यक्त केले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘मशिदींवरील अजानसाठी भोंग्यांचा वापर करणे हा मूलभूत अधिकार नाही’, असा आदेश दिला आहे. त्यावर ते बोलत होते.

        संपादकीय भूमिका

  • जनतेला असे वाटत नसल्याने तिला पुनःपुन्हा न्यायालयात जावे लागत आहे, याचा विचार मौलाना (इस्लामी विद्वान) का करत नाहीत ?
  • वर्ष २००५ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असतांना किती मशिदींनी याचे पालन केले ? आता उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिल्यावर भोंगे उतरवण्यात येऊ लागले आहेत, यावर मौलाना का बोलत नाहीत ?