प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगर्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘याद्वारे ताजमहालच्या संदर्भातील सत्य समोर येईल आणि त्याच्या इतिहासावरून चालू असणारा वाद थांबेल’, असे यात म्हटले आहे. डॉ. रजनीश सिंह यांनी ही याचिका अधिवक्ता रुद्र विक्रम सिंह यांच्या माध्यमातून प्रविष्ट केली आहे.
Open closed doors in Taj Mahal to ascertain presence of Hindu idols: Plea in High Court – The Madras Tribune #MadrasTribune #News #BreakingNewshttps://t.co/bbqH01DWpu pic.twitter.com/xH1VfTy2P4
— The Madras Tribune (@MadrasTribune) May 8, 2022
या याचिकेत म्हटले आहे की,
१. एक शोध समिती स्थापन करून मोगल बादशहा शाहजहान याच्या आदेशाने ताजमहालच्या आतील खोल्यामध्ये लपवण्यात आलेल्या मूर्ती आणि शिलालेख आदी ऐतिहासिक गोष्टी शोधण्यासाठी केंद्र सरकारला आदेश देण्यात यावा.
२. अनेक हिंदु संघटना दावा करतात की, तहामहाल प्राचीन शिवमंदिर आहे आणि त्याला ‘तेजोमहालय’ म्हणून ओळखले जाते. याला काही इतिहासकारांनीही मान्यता दिली आहे. या दाव्यामुळे हिंदू आणि मुसलमान आपापसांत लढत आहेत. त्यामुळे हा वाद नष्ट करण्याची आवश्यकता आहे.
३. इतिहासाच्या काही पुस्तकांमध्ये म्हटले आहे की, वर्ष १२२१ मध्ये राजा परमर्दी देव याने तेजोमहालय मंदिर बांधले होते. मंदिर जयपूरचे तत्कालीन महाराजा राजा मान सिंह यांना ते वंशपरंपरागत मिळाले होते. नंतर शाहजहान याने त्याच्यावर नियंत्रण मिळवले आणि त्याला त्याच्या पत्नीच्या स्मारकाचे रूप दिले.
४. ताजमहलाच्या ४ मजली इमारतीच्या सर्वांत वरच्या आणि सर्वांत खालच्या भागात २२ खोल्या आहेत आणि त्या बंद आहेत. इतिहासकार पु.ना. ओक आणि अन्य इतिहासकारांचे म्हणणे आहे की, याच खोल्यांमध्ये शिवमंदिर आहे. हे सत्य समोर आणले पाहिजे. ताजमहालच्या संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतांना त्याचा खरा इतिहास लोकांसमोर आणणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने सरकारनेच आदेश देऊन खरा इतिहास हिंदूंना सांगितला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! |