१० मार्चला मतमोजणी
पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्यात विधानसभेच्या सर्व ४० मतदारसंघांतील १ सहस्र ७२२ मतदान केंद्रांमध्ये उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. राज्यात ७८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततापूर्ण मतदान झाले. ४० मतदारसंघांमधील ३०१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत ‘सीलबंद’ झाले आहे. निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी आहे.