धनत्यागाच्या माध्यमातून स्वतःला धर्मकार्यात झोकून देणारे आणि साधकांप्रती प्रेमभाव असलेले देहली येथील साधक दांपत्य श्री. संजीव कुमार (वय ७० वर्षे) अन् सौ. माला कुमार (वय ६७ वर्षे) सनातनच्या ११५ व्या आणि ११६ व्या समष्टी संतपदी विराजमान !

सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी पू. संजीव कुमार यांचा, तर ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. मंजुला हरिश कपूर यांनी पू. (सौ.) माला कुमार यांचा पुष्पहार घालून सन्मान केला.

शेतकर्‍यांच्या साहाय्यासाठी १ सहस्र ४१० कोटी, तर एस्.टी. महामंडळासाठी १ सहस्र १५० कोटी रुपयांची तरतूद !

विधानसभेत ३१ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर ! ‘इम्पिरीकल डेटा’साठी ४३५ कोटी रुपयांची तरतूद !

अष्टविनायक देवस्थानमधील काही देवस्थानांच्या सर्वंकष विकासाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

११ ते १३ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी अष्टविनायक देवस्थान आराखड्याच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने दौरा केला आणि सर्व ठिकाणांमधील सुविधा यांच्या संदर्भात बैठक घेतली.

राज्यात तलवारी निघत आहेत, दंगली होत आहेत, रुग्णालयांना आगी लागत आहेत आणि शासन शांत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

विधानसभा कामकाज !

महिलांचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही ! – विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांची भावना

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर अवमान प्रकरणाची चौकशी चालू असून कारवाई होणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

आनंदी जीवनासाठी नामजप तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन आवश्यक ! – श्रीकांत बोराटे

श्री दत्तजयंतीनिमित्त माळवाडी (जिल्हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन !

महावितरण डबघाईला; ६० सहस्र कोटी रुपयांची थकबाकी !

वीजनिर्मिती आणि कामगारांचे वेतन देण्यात परवड होत असल्याचे नमूद करत मंत्र्यांनी विधान परिषदेत व्यक्त केली हतबलता !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविषयी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत कर्नाटक सरकारचा निषेध !

एकनाथ शिंदे म्हणाले, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय करत आहे. स्थानिक मराठी जनतेची मुस्कटदाबी करणे, मराठी पाट्या हटवणे, मराठी शाळा बंद पाडणे, कन्नड भाषेची सक्ती करणे असे प्रकार कर्नाटक राज्यात घडत आहेत.

मुंबईतील गिरणी कामगारांना ३२० चौरस फुटांची घरे देण्याचे गृहनिर्माणमंत्र्यांचे आश्वासन !

मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घोषित झालेली १६० चौरस फुटांची घरे ही खुराड्यासारखी आहेत. मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर भारतात बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर