मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घोषित झालेली १६० चौरस फुटांची घरे ही खुराड्यासारखी आहेत. मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. ही घरे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एम्एम्आर्डीने) बांधलेली आहेत. गिरणी कामगारांसाठी ३२० चौरस फुटांची चांगली घरे देण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिले. गिरणी कामगारांच्या घरांविषयी तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता.