रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांवरही उपचार होण्यासाठी केंद्र सरकारचा प्रस्ताव

देशातील सामान्य नागरिकांनाही रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात प्रस्ताव सिद्ध करून उत्तर-मध्य रेल्वे विभागासह रेल्वेच्या सर्व विभागीय कार्यालयांना पाठवला आहे.

कानपूर येथे धर्मांधाचा साथीदारासह विधवा वहिनीवर सामूहिक बलात्कार

मूलगंज येथे रिजवान याने विधवा वहिनीला शीतपेयामधून अमली पदार्थ पाजले. त्यानंतर साथीदारासह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दोघांनी पीडितेचे आक्षेपार्ह छायाचित्रण केले आणि ते प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्हा नोंदवला आहे.

पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन केले आहे.

कोरोनाच्या काळात त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या अधिग्रहित केलेल्या जागेचे भाडे देण्यास नाशिक जिल्हा प्रशासनाचा नकार !

त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून पैशांची मागणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देवस्थानाला त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देणारे पत्र लिहिले आहे.

शेतकर्‍यांची बाजू घेतली, तर तुम्ही शहरी नक्षलवादी ! – परिसंवादातील सूर

परिसंवादात सहभागी झालेले नाट्यलेखक राजकुमार तांगडे म्हणाले की, सोयाबीनचे दर गडगडतात; परंतु ४ दिवसांत अधिक का गडगडले ?, याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (‘सीबीआय’च्या) चौकशी करण्याची आवश्यकता आहे;

एन्.डी.ए. (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) मध्ये विद्यार्थ्याचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू !

प्रशिक्षणादरम्यान मूळचा मालदीव येथील कॅडेट मोहम्मद इब्राहिम या परदेशी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याविषयी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात् मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देशात को-ऑपरेटिव्ह अधिकोषांच्या घोटाळ्यात महाराष्ट्र अव्वल !

वर्ष २०२०-२१ मध्ये २१७ घोटाळे ! देशभरात १ सहस्र ५३४ नागरी सहकारी बँका आहेत. त्यांपैकी एक तृतीयांश बँका महाराष्ट्रामध्ये आहेत. 

माहूरगड येथील रेणुकादेवी मंदिर, दत्त शिखर मंदिर आणि अनसूया माता मंदिर यांसाठी ‘रोप वे’ उभारण्यासाठी ५१ कोटी रुपयांची संमती

विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देऊन भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच त्या-त्या भागांत रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे.

आरोग्य भरतीची परीक्षा पारदर्शक होईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाराष्ट्रातील आरोग्य भरतीच्या प्रक्रियेत कोणताही चुकीचा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. ही परीक्षा पारदर्शक होईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

गुजरात राज्याकडून अधिक लाभाच्या अटी टाकल्याने नदीजोड प्रकल्पात अडचणी ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

जयंत पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागातील रिक्त पदांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे.