कोरोनाच्या काळात त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या अधिग्रहित केलेल्या जागेचे भाडे देण्यास नाशिक जिल्हा प्रशासनाचा नकार !

त्र्यंबकेश्वर देवस्थान, नाशिक

नाशिक – कोरोनाच्या काळात येथील जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या मालकीच्या जागेच्या भाड्यापोटी त्र्यंबकेश्वर देवस्थानाने जिल्हा प्रशासनाकडे ९९ लाख ६३ सहस्र रुपयांची मागणी केली आहे; मात्र हे पैसे देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.

१. त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून पैशांची मागणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देवस्थानाला त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देणारे पत्र लिहिले आहे.

२. ‘आपल्या संस्थानाची नोंद सार्वजनिक न्यास स्वरूपाच्या सेवाभावी संस्थानात आहे. त्यामुळे अशा संस्थानाने शासनाच्या विनामूल्य उपचारांच्या प्रयत्नास सहकार्य करणे आवश्यक होते. तथापी असे न करता, तसेच कोणताही खुलासा न करता पैशांची मागणी केली आहे’, असे पत्र जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्वर देवस्थानाला दिले आहे. (जर प्रशासनाने वक्फ बोर्डाची जागा भाडेतत्त्वावर घेतली असती आणि बोर्डाने भाड्याची मागणी केली असती, तर याच प्रशासनाने त्वरित भाडे देऊ केले असते, हे लक्षात घ्या ! सहिष्णुता आणि पडते घेण्याच्या हिंदूंच्या वृत्तीमुळेच शासन अशाप्रकारे हिंदूंनाच शहाणपणा शिकवते, हे जाणा ! – संपादक)

३. ‘राज्यातील अनेक दानशूर संस्था आणि मंदिरे कोरोनाच्या काळात सरकारच्या साहाय्यासाठी पुढे आली. त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये पडून आहेत. प्रशासनाकडे पैशांची मागणी करणे अयोग्य आहे. अशी मागणी करणार्‍या देवस्थानांच्या पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करण्यात यावी’, अशी मागणी माजी विश्वस्तांनी केली आहे. (उलट विद्यमान विश्वस्तांच्या योग्य भूमिकेविषयी कौतुक झाले पाहिजे. – संपादक)