पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

धनबाद (झारखंड) – सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या वेळी ‘श्राद्ध’ या विषयावर १५ मिनिटे शास्त्रीय माहिती दिली जाते. त्यानंतर २० मिनिटे सामूहिकरित्या दत्ताचा नामजप केला जातो. या नामजप सत्संगाचा लाभ झारखंड, बंगाल आणि पूर्वाेत्तर राज्य येथील अनेक जिज्ञासू घेत आहेत.