एन्.डी.ए. (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) मध्ये विद्यार्थ्याचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू !

पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एन्.डी.ए.) प्रशिक्षणादरम्यान मूळचा मालदीव येथील कॅडेट मोहम्मद इब्राहिम या परदेशी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याविषयी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात् मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इब्राहिम १२ मार्च २०२१ पासून प्रशिक्षणासाठी एन्.डी.ए.मध्ये दाखल झाला होता. २५ सप्टेंबर या दिवशी प्रशिक्षणाचा भाग असलेल्या उपक्रमात सहभागी असतांनाच तो जागेवर पडला; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. लष्कराच्या न्यायालयाच्या वतीने या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.