कानपूर येथे धर्मांधाचा साथीदारासह विधवा वहिनीवर सामूहिक बलात्कार

नात्याला काळीमा फासणारे वासनांध धर्मांध ! – संपादक 

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कानपूर (उत्तरप्रदेश) – मूलगंज येथे रिजवान याने विधवा वहिनीला शीतपेयामधून अमली पदार्थ पाजले. त्यानंतर साथीदारासह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दोघांनी पीडितेचे आक्षेपार्ह छायाचित्रण केले आणि ते प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्हा नोंदवला आहे. पीडिता औषध घेण्यासाठी मूलगंज येथे गेली होती. तेथे पीडित महिलेची तिचा दिर रिजवान याच्याशी भेट झाली. त्यानंतर औषध देण्याच्या निमित्ताने रिजवान तिला स्थानिक हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेला शीतपेयामधून अमली पदार्थ पाजला. त्यानंतर त्याने सहकारी शाहनवाजला बोलावले आणि हे दुष्कृत्य केले.