आरोग्य भरतीची परीक्षा पारदर्शक होईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राजेश टोपे

मुंबई – उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाची परीक्षा रहित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आरोग्य भरतीच्या प्रक्रियेत कोणताही चुकीचा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. ही परीक्षा पारदर्शक होईल. याविषयी जी ‘ऑडिओ क्लीप’ प्रसारित झाली आहे, त्याविषयीचे अन्वेषण करण्यात येईल. यामध्ये कोणताही चुकीचा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.