(म्हणे) ‘राष्ट्राविषयी अज्ञान दाखवले म्हणून बोललो !’ – राणे यांचे पत्रकार परिषद घेऊन समर्थन !

नारायण राणे

मुंबई – ज्यांना देशाविषयी अभिमान नसतो, त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाविषयी अभिमान आहे, म्हणून सहन झाले नाही. राष्ट्राविषयी अज्ञान दाखवले म्हणून मी बोललो. यापुढे कुणी असे बोलू नये म्हणून आम्ही बोललो, अशा प्रकारे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे २५ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषद घेऊन समर्थन केले. या वेळी नारायण राणे म्हणाले, ‘‘दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. देशात अद्यापही कायद्याचे राज्य आहे. भाजप माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला. मी असे काय बोललो होतो की, राग आला ? मुख्यमंत्र्यांविषयी बोललेले ते वाक्य मी परत बोलणार नाही. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. शिवसेना वाढवण्यात माझे योगदान आहे.’’