हिंदूंवरील आघात थांबवण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे हाच पर्याय ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्या हिंदूंची स्थिती अतिशय वाईट आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदुत्वनिष्ठ आणि साधूसंत यांच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण असे अनेक आघात प्रतिदिन हिंदूंवर होत आहेत.

बलात्काराच्या प्रकरणातील साक्षीदाराची हत्या

बलात्काराच्या प्रकरणाची तात्काळ सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा झाली असती, तर ही वेळ आलीच नसती ! व्यवस्थेतील या त्रुटी सुधारण्यासाठी सरकारी यंत्रणा काय करणार ?

कर्करोगाच्या रुग्णांनी अधिक प्रमाणात शेंगदाणे सेवन केल्यास संपूर्ण शरिरात कर्करोग पसरण्याचा धोका वाढू शकतो ! – संशोधकांचा दावा

संशोधकांच्या मते, ज्या कर्करोगाच्या रुग्णांनी एका दिवसामध्ये २५० ग्रॅम शेंगदाणे सेवन केले, त्यांना अधिक प्रमाणात धोका दिसून आला.

पुणे येथे वाहने भाडेतत्त्वावर लावण्याच्या आमीषाने अडीच कोटींची फसवणूक

बनावट आस्थापनात वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचे आमीष देऊन ९ वाहनांची करारपत्रे बनवली…

संभाजीनगर येथे राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आंदोलन !

भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक शिवलिंगाची स्थापना करून त्याच्यावर अभिषेक केला. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील मंदिरे बंद असून ४ मासांहून तीर्थक्षेत्रांतील दुकानदारांची उपासमार चालू आहे.

जुन्या कंत्राटदाराला भंगार विक्रीचे कंत्राट दिल्याने महापालिकेची ५ कोटींची हानी !

एका कंत्राटदाराने पालिका आयुक्तांकडे याविषयी तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या कंत्राटामागे काहीतरी घोटाळा असल्याचा आरोप केला आहे.

पुण्यातील गणेशोत्सव साधेपणाने करण्यावर गणेशोत्सव मंडळांचे एकमत !

गणेशोत्सवाच्या पूर्वसिद्धतेसाठी महापालिकेने गणेश मंडळांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.

मुंबईत मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत खुली !

मुंबईत काही दिवसांपासून रुग्णवाढ आणि मृत्यूदर यांत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असल्याने महापालिकेच्या प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. सामान्यांसाठी मुंबई लोकल चालू करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६६ वर पोचली !

जळगाव येथे १३, रत्नागिरी १२, मुंबई ११, ठाणे आणि पुणे येथे प्रत्येकी ६, पालघर अन् रायगड येथे प्रत्येकी ३, नांदेड अन् गोंदिया येथे प्रत्येकी २, तर चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, संभाजीनगर, कोल्हापूर आणि बीड येथे प्रत्येकी १ रुग्ण आहे.

मुंबई महापालिकेच्या कोरोनावरील लसीकरण मोहिमेचे मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक !

३० जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत शहरातील ४ सहस्र ८८९ नागरिकांपैकी १ सहस्र ३१७ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती पालिकेकडून न्यायालयाला देण्यात आली.