सर्व गोष्टी चालू होतात, मग मंदिरांवरच निर्बंध का ? या भाविकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे ! – संपादक
मुंबई – महापालिकेने १६ ऑगस्टपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्रकिनारे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत खुली केली आहेत. यासाठी मुखपट्टी (मास्क), सामाजिक अंतर आणि इतर नियमांचे नागरिकांना पालन करावे लागणार आहे.
मुंबईत काही दिवसांपासून रुग्णवाढ आणि मृत्यूदर यांत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असल्याने महापालिकेच्या प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. सामान्यांसाठी मुंबई लोकल चालू करण्यात आली आहे. कोरोनावरील लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे. लोकल प्रवासाची अनुमती देतांना मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी चालू करण्यात आली आहे.