माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स !

अनिल देशमुख

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठवला आहे. अनिल देशमुख यांनी बार चालू ठेवण्यासाठी संबंधितांकडून घेतलेले ४ कोटी ७० लाख रुपये ऋषिकेश देशमुख यांना दिले. हा पैसा ऋषिकेश देशमुख यांच्या आस्थापनाच्या माध्यमातून श्री साई शिक्षण संस्थेकडे दानाच्या माध्यमातून वळवण्यात आला, असा आरोप सक्तवसुली संचालनालयाकडून करण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयाची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने अनिल देशमुख यांना, तसेच त्यांचे स्वीय साहाय्यक संजीव पलांडे आणि पी.ए. कुंदन शिंदे यांना यापूर्वीच समन्स पाठवला आहे.