हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम यांना सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स !

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम यांना आर्थिक अपहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स पाठवण्यात आला आहे. यामी यांच्या अधिकोषातील खात्यामध्ये परदेशी चलनाच्या व्यवहारात अस्पष्टता आढळून आली आहे.

यामी यांना ७ जुलै या दिवशी अन्वेषणासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.