महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे कामकाज ठप्प !

नागरिकांच्या सहस्रावधी तक्रारी प्रलंबित रहाणे, हा अतिशय गंभीर विषय आहे. मानवाधिकार आयोगाचे कामकाज त्वरित चालू होण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे.

नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये सवा वर्षापासून एकही कोरोनाबाधित व्यक्ती आढळली नाही !

गावकर्‍यांच्या सामूहिक प्रयत्नांतून केलेल्या उपक्रमामुळे या गावांत कोरोना पोचू शकला नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

वीरपत्नीचे स्वागत !

दीड-दोन वर्षांपूर्वी हुतात्मा मेजर धौंडियाल यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आणल्यावर डोक्यावर पदर घेतलेल्या निकिता कौल यांनी अश्रू न ढाळता, पतीला कडक ‘सॅल्यूट’ ठोकला आणि ‘माझे तुमच्यावर प्रेम आहे’ असे सांगत जणू पतीशी एकरूप होण्यासाठी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

शेवगाव येथे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती मंगलमय वातावरणात साजरी !

शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे आधारस्तंभ तथा कल्याण निवासी अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची १०२ वी जयंती बुद्धपौर्णिमेच्या शुभपर्वणीला मंगलमय वातावरणात साधेपणाने साजरी करण्यात आली.

कीर्तन मंजिरी ह.भ.प. संध्या पाठक यांच्या ‘श्रीमद् भागवत कथा’ निरुपणास प्रारंभ !

हे निरुपण प्रतिदिन दुपारी ४ वाजता प्रारंभ होते आणि ते ४ जूनअखेर चालणार आहे. तरी ज्या भाविकांना याचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी लवकरात ९६५७० ३१८२२ यावर संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा.

कराड येथे रुग्णालयात उपचार घेणार्‍या कोरोनाबाधित महिलेच्या मंगळसूत्राची चोरी

महिलेला कोरोना झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यातच तिला मेंदू विकाराचाही झटका बसला होता. उपचारानंतर तिला घेण्यास आलेल्या तिच्या मुलाला आईच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले. याविषयी त्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ते सापडले नाही.

हिंदुविरोधी बिनदिक्कतपणाला आवर घाला !

‘असंतांचे संत !’ या मथळ्याखाली मदर तेरेसा यांच्यावर टीका केल्यानंतर कट्टरपंथियांच्या दबावापुढे गिरीश कुबेर यांना झुकावे लागले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात धादांत खोटे लिखाण केल्यानंतर सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध होत असतांनाही कुबेर थंड आहेत

गंभीर संसर्ग असणार्‍या कोरोना रुग्णांवर उपचारास नकार दिल्यास कठोर कारवाई ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या संदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही चेतावणी दिली.

हिंदुद्वेषी फेसबूकला वैध मार्गाने विरोध करा !

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात आली आहेत.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आतापासून औषधी वनस्पतींची लागवड करा !

या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती देत आहोत.