
शेवगाव (नगर) – शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे आधारस्तंभ तथा कल्याण निवासी अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची १०२ वी जयंती बुद्धपौर्णिमेच्या शुभपर्वणीला मोजके साधक आणि दत्तभक्त यांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात साधेपणाने साजरी करण्यात आली. योगतज्ञ प.पू. दादाजींच्या चांदीच्या पादुकांवर उपस्थित साधकसमूह आणि भक्त यांच्या हस्ते एकादस्नी रुद्राभिषेक घालण्यात आला. या वेळी सामुदायिक मंत्रपठणही झाले. श्री. तुकाराम चिक्षे गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, फुलचंद रोकडे, पी.बी. शिंदे, बाबुशेठ जोशी, संजय कुलकर्णी, लक्ष्मण काळे, जगन्नाथ गोसावी, प्रा. काकासाहेब लांडे, ओमप्रकाश बाहेती, बन्सीधर पांगरे, सारंगधर म्हस्के, गणेश घोडके, रामनाथ शेकडे, प्रशांत गोसावी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !