आता गुळणीद्वारे कोरोनाची चाचणी करता येणार !

या पद्धतीमध्ये ३ घंट्यांमध्ये कोरोनाच्या चाचणीचा अहवाल कळतो. ‘सलाईन गार्गल आर्टी-पीसीआर्’ असे या पद्धतीचे नाव आहे.

आता संध्याकाळीही मिळणार शिवभोजन !

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरीब आणि गरजू व्यक्तींना शिवभोजन थाळी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

राज्यातील दळणवळणबंदीच्या निर्बंधांमध्ये १५ जूनपर्यंत वाढ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ ही मोहीम राबवण्याची, तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे दायित्व शासन घेणार असल्याचे या वेळी उद्धव ठाकरे यांनी घोषित केले.

राज्य सरकार आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

सहा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांचे ओबीसी आरक्षण रहितच !

मराठवाड्यातील ४०० बालरोगतज्ञ कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत काम करणार !

‘बालरोगतज्ञ संघटनेकडून ‘मिशन कोविन उदय’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय बालरोगतज्ञांकडून माहिती दिली जात असून संभाव्य नियोजन केले जात आहे.

आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले ! – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे

पीकविमा वाटपात महाविकास आघाडीने पक्षपात केला ! – भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा आरोप

‘तालुक्यात गेल्या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातचे पीकही वाया गेले होते; मात्र हानीभरपाईच्या साहाय्यापासून तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला आहे…

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात ! – देवेंद्र फडणवीस

केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष अन् नाकर्तेपणा यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अन्य मागासवर्गीय समाजासाठी असलेले आरक्षण संपुष्टात आले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे. 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणार्‍याला अटक

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणार्‍या सागर मंदेरा या युवकाला नागपूर येथून पोलिसांनी कह्यात घेतले आहे. तो मतीमंद असल्याचे सांगितले जात आहे. ३० मे या दिवशी दुपारी मंत्रालयाच्या आपत्कालीन कक्षात दूरभाष करून त्याने ही धमकी दिली होती

वाशिम जिल्ह्यात बोगस धर्मांध डॉक्टरवर कारवाई

जिल्ह्यातील कारंजा येथे रौशन क्लिनिक या नावाने चालू असलेल्या एस्.एम. सिद्दीकी या बोगस डॉक्टरच्या रुग्णालयावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे.