हनुमान जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन

पाटलीपुत्र (बिहार) – सध्या संपूर्ण देश कोरोना संसर्गामुळे ग्रस्त आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी समाजाचे मनोबल वाढावे, त्यांची चिंता न्यून व्हावी आणि भाव-भक्ती वाढावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंतीच्या दिवशी उत्तरप्रदेश अन् बिहार या राज्यांमध्ये सामूहिक नामजप, प्रवचने आदी ‘ऑनलाईन’ उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमांचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

  •  हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचे तत्त्व १ सहस्र पट अधिक असते. हे लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांमध्येही संकट निवारणासाठी हनुमानाच्या पूजनाचे शास्त्र, त्याच्या जपाचे महत्त्व, साडेसाती निवारणासाठी मारुतीची पूजा कशी करावी आदींविषयी माहिती सांगण्यात आली.
  • लहान मुलांमध्ये हनुमानाविषयी भक्तीभाव वाढावा, यासाठी समितीच्या वतीने बालसंस्कारवर्गांमध्येही त्याचे गुण आणि नामजप यांविषयी माहिती सांगण्यात आली.
  •  या कार्यक्रमाविषयी जिज्ञासूंनी सांगितले की, या कार्यक्रमांमुळे त्यांची ईश्वरावरची श्रद्धा वाढली आणि मन स्थिर होऊन सकारात्मक झाले. अशा प्रकारचे आयोजन यापुढेही व्हावे, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.