आपत्काळातही स्वार्थापोटी जनतेच्या जिवावर उठलेल्या अशा गुन्हेगारांना कडक शासन केले पाहिजे !
ठाणे, ३० एप्रिल ( वार्ता.) – आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीविनाच कोरोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल सिद्ध करून त्याची विक्री करणार्या धर्मांधांच्या टोळीतील आणखी एकास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी प्रयोगशाळेचा मालक मेहफुज आलम मुजिबुल्ला खान, त्याचा भाऊ आफताब आलम, तंत्रज्ञ मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख आणि इनामुलहक उपाख्य रब्बानी अशा चौघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आता आरोपींची संख्या ५ झाली आहे. ही टोळी चाचणी न करताच ५०० रुपयांत अहवाल देेत असे. पोलिसांनी त्यांच्याकडून कोरोनाच्या चाचणीचे ६४ बनावट अहवाल जप्त केले आहेत. तसेच प्रयोगशाळेतून काही इतरही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.