नारायण दाभाडकर यांच्या निधनानंतर त्यांच्यावरील टीकेप्रकरणी भाजपचे नेते अवधूत वाघ यांचे ट्वीट !
मुंबई – नागपूरमधील ८५ वर्षीय नारायण दाभाडकर यांनी रुग्णालयातील स्वतःचा बेड दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाला दिला आणि घरी गेल्यावर ३ दिवसांनी त्यांचे निधन झाले. ही घटना सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली. अनेकांनी विरोध दर्शवला. रुग्णालयानेही त्यांच्या विरोधात वृत्त दिले. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ‘आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाहीत !’, असे ट्वीट केले. वाघ यांच्या ट्वीटला पुरोगाम्यांनी मोठ्या प्रमाणात आणि अतिशय हीन पातळीला जाऊन टीका करत विरोध दर्शवला. (पुरोगाम्यांची वैचारिक दिवाळखोरी ! – संपादक)
आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…….
— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) April 29, 2021