सोलापूर जिल्ह्यात २० मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल !

आता रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजनविषयी उपाययोजनांसंदर्भात बोलतांना सांगितले.

५० वर्षीय महिलेचे छायाचित्र काढून विनयभंग करणार्‍या धर्मांधा विरोधात जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद !

अल्पसंख्य असलेले धर्मांध महिलांचा विनयभंग करण्यामध्ये बहुसंख्य !

कोरोना महामारीच्या काळात सुमारे ६ सहस्र गरजू लोकांना विनामूल्य शिवभोजन !

जिल्ह्यातील ५ सहस्र ८३८ लोकांना शिवभोजन भोजन सध्या ‘पार्सल’सेवेद्वारे विनामूल्य पुरवण्यात येत आहे.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आरती !

आमदार गाडगीळ यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

कोरोनाच्या काळात भारतीय सैन्याचे साहाय्य घेऊ शकतो का ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

भारतीय सैन्य, अर्धसैनिक दल, तसेच भारतीय रेल्वेचे डॉक्टर केंद्राच्या अखत्यारीत येतात. अशा वेळी ‘क्वारंटाईन’, लसीकरण किंवा इतर ठिकाणी त्यांचे साहाय्य घेऊ शकतो का ? यावर राष्ट्रीय योजना काय आहे ?, असे प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले. ‘

बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल ! – केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना सल्ला

तथाकथित आणि ढोंगी पुरो(अधो)गाम्यांना श्रद्धा काय असते, हेच ठाऊक नसल्याने ते टीका करणारच ! त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, देशातील कोट्यवधी हिंदू अद्यापही श्रद्धावान आहेत. त्यामुळेच भारत अनेक संकटातही तरून जात आहे आणि पुढेही जात राहील !

‘आमचे कर्तव्य नाही’ असे तुम्ही म्हणू शकत नाही !- देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

देहलीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्यामुळे देहली उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना फटकारले. केंद्र सरकारने हे आपले दायित्व नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने ‘हे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचे दायित्व आहे.

कोरोना महामारीसारख्या कठीण काळात आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अर्थहीन ! – ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन

जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.