कोल्हापूर, २७ एप्रिल (वार्ता.) – दळणवळण बंदी लागू झाल्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरीब, कष्टकरी, तसेच गरजू लोकांसाठी विनामूल्य शिवभोजन आधार ठरत आहे. जिल्ह्यातील ५ सहस्र ८३८ लोकांना हे भोजन सध्या ‘पार्सल’सेवेद्वारे विनामूल्य पुरवण्यात येत आहे. १४ एप्रिलपूर्वी ही संख्या सुमारे ४ सहस्र होती आणि केवळ ५ रुपयांत ते देण्यात येत होते. १४ एप्रिलनंतर ही संख्या प्रत्येक जिल्ह्यात दीडपट करण्यात आली आहे, तसेच ते विनामूल्य देण्यात येत आहे. सामाजिक अंतरांचे पालन करून हे शिवभोजन सध्या देण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.