बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल ! – केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना सल्ला

असा सल्ला देणार्‍या केंद्रीय मंत्र्यावर टीका

  • तथाकथित आणि ढोंगी पुरो(अधो)गाम्यांना श्रद्धा काय असते, हेच ठाऊक नसल्याने ते टीका करणारच ! त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, देशातील कोट्यवधी हिंदू अद्यापही श्रद्धावान आहेत. त्यामुळेच भारत अनेक संकटातही तरून जात आहे आणि पुढेही जात राहील !

  •  सध्याच्या आपत्काळात जनतेला अशाच प्रकारचे आवाहन करण्याची आवश्यकता आहे; मात्र केंद्रीय मंत्र्यांनी आरोग्ययंत्रणा अधिक तत्पर होण्यासाठीही प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
डावीकडून गजेंद्रसिंह शेखावत

नवी देहली – बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल, असा सल्ला जोधपूर येथील एका रुग्णालयात कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना दिल्याने केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर टीका होऊ लागली आहे. त्यावर शेखावत यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.

शेखावत यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, डॉक्टर त्यांचे काम करत आहेत. बालाजीवर श्रद्धा ठेवा आणि नारळ वहा, असा सल्ला देण्यात काय चुकीचे आहे ? राजस्थानमध्येच नाही, तर देश आणि जगात कोट्यवधी लोक बालाजीचे भक्त आहेत. जर मी नारळ वहाण्यास सांगितले, तर त्यात मी निष्क्रीय आणि दायित्वशून्य कसा ठरू शकतो ? रुग्णालयात भरती असणार्‍या रुग्णाच्या नातेवाइकांना मानसिक आधार देणे चुकीचे आहे का? घाबरलेल्या रुग्णाच्या आईच्या मनाला शांती मिळावी म्हणून तिला आधार देणे, तसेच औषधांसमवेत प्रार्थनाही कामी येतील, हे सांगायचे काम मी केले. डॉक्टरांकडून मिळणार्‍या उपचारांच्या संदर्भात मला काहीही शंका नसून ते त्यांचे दायित्व अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडत आहेत.