५० वर्षीय महिलेचे छायाचित्र काढून विनयभंग करणार्‍या धर्मांधा विरोधात जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद !

अल्पसंख्य असलेले धर्मांध महिलांचा विनयभंग करण्यामध्ये बहुसंख्य !

सोलापूर – शहरातील पूर्व मंगळवार पेठ येथे सलाम नूरअहमद खलिफा या आरोपीने त्या भागात रहात असलेल्या ५० वर्षीय महिलेचे भ्रमणभाषमध्ये छायाचित्र काढून तिचा हात धरून विनयभंग केला. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली असून जेलरोड पोलीस ठाणे येथे सलाम नूरअहमद खलिफा याच्याविरोधात येथील जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे संबंधित महिलेने घाबरून आरडाओरडा केला. पीडित महिलेने घडलेल्या प्रकाराची माहिती मुलाला सांगितली. मुलाने याविषयी सलाम याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता तो तेथून पळून गेला.